घरताज्या घडामोडीमेधा सोमय्या बदनामीप्रकरणी संजय राऊतांना न्यायालयाचे समन्स, किरीट सोमय्यांची माहिती

मेधा सोमय्या बदनामीप्रकरणी संजय राऊतांना न्यायालयाचे समन्स, किरीट सोमय्यांची माहिती

Subscribe

संजय राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून माहिती दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रा.डॉ. मेधा सोमय्या (Pro. Dr. Medha Somaiya) यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात न्यायालयाने समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून माहिती दिली. (Medha Somaiya’s defamation case, Sanjay Raut received court summons)


काय आहे प्रकरण?

- Advertisement -

संयज राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

- Advertisement -

राऊतांनी काय आरोप केला होता?

सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा आहे. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.

सोमय्यांचे प्रत्युत्तर

राऊतांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर देताना सोमय्या म्हणाले होते की, राऊतांनी आमच्यावर 100 कोटींचा टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला. मी ठाकरे सरकारला आव्हान केलं की 100 पैशाचा घोटाळा तर दाखवा. राऊतांवर क्रिमिनल अॅक्शन घ्या. मेधा सोमय्या या 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. राऊत यांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं आहे. सोमय्या परिवारावर दडपण आणलं. राऊतांविरोधात क्रिमिनिल डिफिमेशनची केस नोंदवणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -