विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जारी, समोर आली महत्त्वाची माहिती

विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनीही काल रात्री माध्यमांना प्रतिक्रिया देऊन विक्रम गोखलेंविषयी पसरण्यात आलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, आज सकाळी राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे याकरता प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

vikram gokhale

पुणे – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी कळकळीची विनंती विक्रम गोखले यांचे जवळचे निकटवर्तीय राजेश दामले यांनी केली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त खोटे, पत्नी वृषाली गोखलेंनी दिली माहिती

राजेश दामले म्हणाले की, विक्रम गोखले यांची प्रकृती गेल्या २४ तासांपासून चिंताजनक आहे. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांच्या उपचारांना ते साथ देत नाहीत. त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे डॉक्टर अधिक काहीही सांगू शकत नाहीत.

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहे. अफवा पसरवत असेल तर थांबवा आणि त्यावर प्रतिबंध घाला, असं राजेश दामले म्हणाले.

गेल्या १९ दिवसांपासून विक्रम गोखले पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती खालावली. परंतु, त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरवल्या गेल्या. त्यामुळे विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनीही काल रात्री माध्यमांना प्रतिक्रिया देऊन विक्रम गोखलेंविषयी पसरण्यात आलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, आज सकाळी राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे याकरता प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.