घरमहाराष्ट्रMedical Exam 2021 : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० जूनपासून- अमित देशमुख

Medical Exam 2021 : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० जूनपासून- अमित देशमुख

Subscribe

राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या येत्या २ जूनपासून होणाऱ्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने या परीक्षा येत्या १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येतील असे जाहीर केले. शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्जाभातील माहिती दिली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा येत्या १० ते ३० जूनपासून सुरु होणार आहे. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वैद्यकीय पदवी परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वाढता कोरोना संसर्ग पाहता ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या २ जूनपासून होणाऱ्या परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होता, मात्र आज वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून २ जूनपासून होणाऱ्या परीक्षा १० जूनवर ढकलल्या आहेत.

- Advertisement -

त्यामुळे राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मेनंतर परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्ह असल्याने परीक्षांचे नियोजन हे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लवकर या परीक्षांचे नवीन सुधारित वेळापत्रक वैद्यकीय शिक्षण मंडळाकडून जाहीर केले जाणर असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -