घरताज्या घडामोडीवडील मुलीला कॉलेजमध्ये सोडायला गेले ती शेवटची भेट ठरली, मेडिकलच्या विद्यार्थीनीने 'असे'...

वडील मुलीला कॉलेजमध्ये सोडायला गेले ती शेवटची भेट ठरली, मेडिकलच्या विद्यार्थीनीने ‘असे’ संपवले जीवन

Subscribe

पुण्यातील बी. जे मेडिकल कॉलेजमधील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अदिती दलभंजन (20) असे या विद्यार्थीनीचे नाव असून तिने ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली.

पुण्यातील बी. जे मेडिकल कॉलेजमधील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अदिती दलभंजन (20) असे या विद्यार्थीनीचे नाव असून तिने ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेनंतर ससून रुग्णालय आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (medical student dies after jumping from terrace of sassoon hospital in pune)

मिळालेल्या माहितीनुसार, अदिती दलभंजन ही पुण्यातील सिंहरोड येथील रहिवाशी आहे. अदिती ही बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाकरीता शिकत होती. त्यावेळी परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने त्याच्या नैराश्यातून अदितीने ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हा धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली.

- Advertisement -

इमारतीवरून उडी मारल्यानंतर आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अदितीला तत्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, अदिती ही आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होती. ती अभ्यासात अतिशय हुशार असून तिने चांगल्या पध्दतीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करून बी.जे. मेडिकलला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. मात्र, तिच्या कॉलेजच्या परीक्षेचा अभ्यास न झाल्याने तिला काही प्रमाणात नैराश्य आले होते. तिने वडिलांना याची कल्पनादेखील दिली होती.

- Advertisement -

बुधवारी सकाळी तिचे वडील तिला नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये सोडून गेले. मात्र, अभ्यास न झाल्याने तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करताना तिचा मोबाईल टेरेसवरच ठेवला होता. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे.


हेही वाचा – अयोध्येत रामनवमीचा उत्साह! शरयू काठावर रामभक्तांची गर्दी, एक क्विंटल पंचामृताने अभिषेक होणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -