घरताज्या घडामोडीमेडीसिटी, रामालयम रूग्णालयाची मान्यता रद्द

मेडीसिटी, रामालयम रूग्णालयाची मान्यता रद्द

Subscribe

रूग्णांकडून अवास्तव बिल आकारले जात असल्याने कारवाई

रूग्णांकडून अतिरिक्तं बिले आकारली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत नाशिकमधील मेडीसिटी आणि रामालयम या दोन्ही रूग्णायांची मान्यता रदद करण्याबरोबरच या रूग्णालयांवर साथरोग व नर्सिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचेही आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. रूग्णांना साध्या कागदावर बिले देणे, लेखापरिक्षकांना तपासणीसाठी बिले उपलब्ध करून न देणे अशा अनेक त्रुटी या रूग्णालयांच्या तपासणीत आढळून आल्या होत्या.

गत आठवडयात गंगापूर रोडवरील मेडीसिटी हॉस्पिटलमध्ये रूग्णाला डिस्चार्ज देताना तब्बल 3 लाख 45 हजाराचे बिल दिले. ज्या रुग्णाचे बिल शासन नियमाप्रमाणे केवळ 1 लाख रुपये अपेक्षित होते, त्या जागी साडेतीन लाखांचे बिल दिल्याने त्यांच्या कुटूंबियांना धक्काच बसला. महापालिकेच्या लेखापरिक्षकांमार्फत बिलाची तपासणी केली असता उपचारासाठी जे दर आकारण्यात आले होते प्रत्यक्षात त्या सुविधाच रूग्णालयांमध्ये दिसून आल्या नाही. त्याचप्रमाणे रामालयम रूग्णालयाच्या बाबतीतही अनेक तक्रारी आल्या होत्या. महापालिकेच्या लेखापरिक्षकांनी या रूग्णालयांना भेट देत तपासणी केली असता रूग्णांना साध्या कागदावर बिल देणे, शासन निर्देशानूसार ८० टक्के बेड राखीव ठेवण्याचे निर्देश असतांना उर्वरित २० टक्के बेडवर रूग्ण दाखल करून अतिरिक्त बिल आकारणे, रूग्णालयांकडून लेखापरिक्षकांना तपासणीसाठी बिले उपलब्ध करून न देणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या.

- Advertisement -

 

या दोन्ही रूग्णालयांची लेखापरिक्षकांनी तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार या रूग्णालयांची मान्यता रदद करण्याचे आदेश दिले आहेत. या संकटकाळात अनेक डॉक्टर्स, आरोग्य सेवक दिवसंरात्र आरोग्यसेवेत कार्यरत असतांना काही रूग्णालयांकडून केवळ नफा कमावण्याच्या हेतूने अशा प्रकारे रूग्णांची लूट केली जात आहे हे खरोखरच दुर्देवी आहे.
– कैलास जाधव,
आयुक्त, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -