घरताज्या घडामोडीयुतीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज पहिलीच बैठक?

युतीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज पहिलीच बैठक?

Subscribe

माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजून आघाडीशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही नेत्यांच्या युतीच्या निर्णयानंतर आज पहिली बैठक संध्याकाळी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजून आघाडीशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही नेत्यांच्या युतीच्या निर्णयानंतर आज पहिली बैठक संध्याकाळी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या. त्यामुळे त्यांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फुट पडली. अनेक आमदार खासदरांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सहभाग घेतला. त्यानंतर पुन्हा एका पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगल्या असून, याच संदर्भात दोन्ही नेत्यांची पहिली बैठक होणार आहे.

- Advertisement -

पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता उद्धव ठाकरे प्रयत्नशील असून, त्यांना मुंबई महापालिकेवर आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करायचे आहे. त्या दृष्टीने वंचित आघाडी सोबत चर्चा सुरू होती. प्रकाश आंबेडकर यांनी युतीसंदर्भात ग्रीन सिग्नल दिला. मात्र, महाविकास आघाडीत वंचितचे काय स्थान राहील या बाबत भूमिका स्पष्ट करण्यास देखील त्यांनी ठाकरे यांना सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, येत्या काळात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बळकटी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रे’नंतर काँग्रेसचे २६ जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -