घरमहाराष्ट्रतब्बल ५८ वर्षानंतर काँग्रेस कार्यकारिणीची गुजरातमध्ये बैठक

तब्बल ५८ वर्षानंतर काँग्रेस कार्यकारिणीची गुजरातमध्ये बैठक

Subscribe

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारणींची ५८ वर्षीनंतर गुजरातमधील गांधीनगर येथे बैठक तसेच रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्याच बैठकीत हार्दिक पटेल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणूकांच्या तारखा नुकत्याच जाहिर झाल्या आहेत. राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांचा प्रचारास सुरुवात झाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची निवडणूकांच्या तारखा जाहिर झाल्यानंतरची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारणींची बैठक ही गुजरातमधील गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही काँग्रेसची बैठक ५८ वर्षानंतर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सचिव प्रियंका गांधी, राज्याचे मुख्य मंत्री तसेच अनेक दिग्गज नेतेही त्या बैठकीत सहभागी झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडल्यानंतर गांधीनगरच्या अडालजमध्ये ‘जय जवान जय किसान’ बॅनरखाली एक सार्वजनिक रॅली आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच बैठकीत हार्दिक पटेल काँग्रेस अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपची डोकेदु:खी वाढणार 

दरम्यान, काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या. अखेरिस दि. १० रोजी संध्याकाळी हार्दिक पटेल यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंट वरून त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केला होता. २०१५ नंतर हार्दिक पटेल हे नाव गुजरातमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाले होते. तसेच २०१७ च्या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपच्या हार्दिक पटेलने भाजपच्या तोंडाला फेस आणले होते. त्यामुळे लोकसभा निवडणूकांमध्ये पटेल हे भाजपच्या डोक्याचा ताप वाढणार आहे. गुजरात गांधीनगर येथेच हार्दिक पटेल काँग्रेस पक्षांंमध्ये प्रवेश करणार आहेत.

- Advertisement -

या कार्यक्रमाची रुपरेषा

मंगळवारी सकाळी ८.५५ ला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सचिव प्रियंका गांधी अहमदाबाद एअरपोर्टवर पोहचले. ९.३०ला काँग्रेस नेते शाहीबाग सरकीट हाऊसला पोहचले. ९.५० ला साबरमती गांधी आश्रममध्ये प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर १०.३० वाजता शाहीबादच्या शहीद स्मारकला काँग्रेसच्या नेत्यांकडून पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. १०.५० ला सरदार पटेल स्मारक शाहीबागमध्ये कार्यकारणीची बैठक होणार आहे. १.४० ला गांधीनगर अडालजच्या त्रिमंदीर मैदानापासून ‘जय जवान जय किसान’ या बॅनरखाली सार्वजनिक रॅली आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -