घरमहाराष्ट्रआरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंगोली येथे भुजबळ-जरांगे पाटील येणार आमने-सामने

आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंगोली येथे भुजबळ-जरांगे पाटील येणार आमने-सामने

Subscribe

हिंगोली : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत पेटला आहे. आरक्षणाच्या मुद्दावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. जरांगे पाटी आणि भुजबळ सभा घेत आहेत. दोन्ही नेते एकामागून एक सभा घेणार आहे.

हिंगोलीमध्ये रामलीला मैदानावर 26 नोव्हेंबरला छगन भुजबळ यांची भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांची देखील हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रास कऱ्हाळे फाट्यावर 110 एकरवर सभा होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन केले आहे. 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्यातील ओबीसी नेते हजर असणार असल्याचे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. उ‌द्घाटक छगन भुजबळ तर अध्यक्षस्थानी प्रकाश शेंडगे राहतील. ओबीसींच्या एल्गार महामेळाव्यासाठी हिंगोली जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहेत. ओबीसी प्रवर्गातमध्ये मोडणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

जरांगे पाटील यांची अंबड येथील सभेला छगन भुजबळ सभेतूनच उत्तर देणार असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळांच्या सभेत उपस्थित राहणार नसल्याचं सांगितले आहे. ओबीसी नेत्यांमध्ये पडलेल्या फुटीवर भुजबल काय बोलणार हे पाहण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. चौथ्या टप्प्यात जरांगे पाटील हिंगोली जिल्ह्यात सभा घेणार आहेत. हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रास कऱ्हाळे या फाट्यालगत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी तब्बल अडीचशे एकर शेतजमीनवर तयारी सूरू आहे. 110 एकरवर सभा होणार आहे तर 150 एकर जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासभेची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र या सभेची तारीख अद्यापही जाहिर झालेली नाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -