घरदेश-विदेशगृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, बोम्मईंचा पुन्हा महाराष्ट्राला इशारा

गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, बोम्मईंचा पुन्हा महाराष्ट्राला इशारा

Subscribe

Maharashtra Karnatak Border Conflict | सोमवारी कर्नाटकच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा मी त्याला भेटायला सांगितले. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असं बोम्मई म्हणाले.

बेळगाव – महाराष्ट्राच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाहांची शुक्रवारी भेट घेतली. मात्र, या भेटीमुळे काहीही साध्य होणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करून पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं आहे.

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. सोमवारी कर्नाटकच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा मी त्याला भेटायला सांगितले. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असं बोम्मई म्हणाले.

- Advertisement -

एकही इंच देणार नाही

- Advertisement -

याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला कालही डिवचलं होतं. कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही,” असं बोम्मईंनी ठामपणे सांगितलं होतं.

हेही वाचा – महाराष्ट्राला एकही इंच देणार नाही, सीमाप्रश्नी बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांचे संरक्षण करण्याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे. नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितलं आहे, असंही बोम्मई यांनी म्हटलं.

कोल्हापुरात जमावबंदी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी कोल्हापुरात पुढील १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाविरोधात जाणाऱ्यांवर कलम १४४ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे आदेश जारी केले आहेत. या काळात मिरवणुका आणि सभांनाही मनाई करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -