रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मोगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मोगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे मुंबई उपनगर विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार आहे. तसेच लोकलची संख्याही काही प्रमाणात कमी असणार आहे. (Mega Block on Central and harbor railway line on sunday)

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 वा. या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन मार्गावर वळवण्यात येतील.

शिवाय, घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 वा. या वेळेत सुटणाऱ्या अप मार्गावरल धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहे.

हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत मोगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पनवेल (Panvel) येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.


हेही वाचा – काय तो पाऊस…’बीएमसी’ एकदम ओकेमध्ये; नवा व्हिडीओ पाहिलात का?