मुंबईकरांनो, आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; ‘हे’ वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा!

railway

मुंबई – आज लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Mega block on central railway western railway and harbor railway line)

मध्य रेल्वे 

या अंतर्गत माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. याअंतर्गत सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल. या गाड्या नियोजित स्थळी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबून माटुंगा येथे पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील. या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक राहील.

हार्बर रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 या वेळेत मार्गिका सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत आणि अप हार्बर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत गोरेगाव/वांद्रे मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान 20 मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या ब्लॉक कालावधीत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम मार्ग

सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते 15.00 वाजेपर्यंत 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय गाड्या जलद मार्गावर आणि सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरील सर्व उपनगरी गाड्या वळवण्यात येतील.

सर्व धीम्या उपनगरीय गाड्यांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबे दिले जातील तर जलद मार्गावर फलाट उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही दिशेच्या उपनगरीय गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.


हेही वाचा – वसई-विरार बनतेय गुन्हेगारीचे व्हॉटस्पॉट!