घरताज्या घडामोडीMumbai Local Mega block: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Mumbai Local Mega block: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Subscribe

मध्य आणि हार्बर मार्गावर येत्या ११ जून रोजी मेगाब्लॉक असणार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप-धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
(बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून)

- Advertisement -

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

- Advertisement -

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि
ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागात विशेष लोकल धावतील. तर ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. तसेच बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

ब्लॉकचा कालावधी : ००.०० तास ते १४.०० तास 

वांद्रे आणि गोरेगाव दरम्यान हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवा खाली दिलेल्या तपशीलानुसार अनुपलब्ध राहतील: वांद्रे ते गोरेगाव १०.०६ .२०२३ रोजी २३.५५ तास ते २१.०५.२०२३ रोजी १३.५५ वाजेपर्यंत आणि ११.०६ .२०२३ रोजी २३.३३ वाजेपासून गोरेगाव ते वांद्रे १०.०६ .२०२३ रोजी १४.०५ वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील रद्द राहतील.

उपनगरीय ट्रेन धावण्याची पद्धत खालीलप्रमाणे असेल

• गोरेगावसाठी शेवटची लोकल GN 83 गोरेगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस येथून २२.५४ वाजता सुटेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस शेवटची लोकल GN 86 असेल जी गोरेगावहून येथून २३. ०६ वाजता सुटेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस साठी पहिली लोकल GN 48 असेल जी गोरेगावहून १४.३३ वाजता सुटेल.
• गोरेगावसाठी पहिली लोकल GN 45 असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस वरून १४.१८ वाजता सुटेल.


हेही वाचा : MyMahanagar पत्रकार धमकी प्रकरण : झिशान सिद्दीकींचा काँग्रेसच्या जगताप, वाघमारेंकडून निषेध


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -