घरमहाराष्ट्रमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, विशेष गाड्या चालवणार; वेळापत्रक पाहा!

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, विशेष गाड्या चालवणार; वेळापत्रक पाहा!

Subscribe

मुंबई – देखभाल, दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामांसाठी प्रत्येक रविवारी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येतो. आजही मध्य (Central) आणि हार्बर (Harbour) मार्गावर मेगा ब्लॉक नियोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर घराबाहेर पडण्याआधी आजचे वेळापत्र क नक्की जाणून घ्या. (Mega block on Central and Harbour railway Line)

मध्य मार्गावर कशी असेल रेल्वेसेवा?

- Advertisement -

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गाने वळवण्यात येतील आणि वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हेही वाचा – पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या मोटरमनला चक्कर आली अन्…; मालाड स्थानकातील घटना

- Advertisement -

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील त्यांच्या वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील. तसेच, माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बरवरही मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर/मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

विशेष उपनगरीय गाड्या

ब्लॉक कालावधीत पनवेल – मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्या येणार असल्याचंही रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -