५० खोके महागाई एकदम ओके, मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात क्रांती चौकात अनोख्या पद्धतीने आंदोलन

औरंगाबाद – औरंगाबाद येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यसरकार विरोधात ५० खोके महागाई एकदम ओके असे अभिनव आंदोलन करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास शहरातील प्रसिद्ध क्रांती चौक येथे हे आंदोलन पार पडले. यात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अभिनव अशा या आंदोलनाने उपस्थित सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणेने परिसर दणाणून गेला.

शहराध्यक्ष डॉ. मयुर मोहनराव सोनवणे, कार्याध्यक्ष कय्युम शेख यांनी या आंदोलनाचे आयोजन केले. यावेळी अभिनव असा देखावा सादर करत बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली. गुवाहाटी येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोरील झाडे आणि डोंगराचे चित्र काढून देखावा सादर करण्यात आला.अशा वेगवेगळ्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील ४० आमदार नाराज होऊन आसाम येथील गुवाहाटी येथे गेले होते. तेव्हा ही घोषणा प्रसिद्ध झाली होती. त्याच धाग्याला पकडून आज शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी आमदारावर टीका केली आहे.

यावेळी ५० खोके महागाई एकदम ओके..जनता भरती जीएसटी गद्दार जातात गुवाहाटी…महागाई कशासाठी आमदारांच्या खरेदीसाठी…महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके ५० खोके…बहुत हो गई महंगाई की मार चलो हटा मोदी सरकार…. अशा अभिनव घोषण देण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन मुल्ला, प्रदेश सचिव अरुण आजबे,पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तर्माले,अनुराग शिंदे,बादशहा अन्सारी,विशाल विराले,जुबेर खान,ऋषिकेश खैरे, मुख्तार खान,राम पंडित,सुदर्शन बोडखे,सचिन उसरे, नवीद खान,सागर नलावडे,दादासाहेब फल्ले,फैजल शहा,सुशील अंभोरे,गणेश अडसूळ,शाहरुख शेख,अख्तर पटेल, सनी पाटील,वसीम मानियार, विशाल हिवराळे,प्रशांत दळवी, शुभम खेत्रे, सोफियन बागवान,अतुल गावंडे, आशुतोष सांगोले,मंगेश मोरे,आदित्य रगडे,अलीम शेख,रोहित चांचलनी, अजय साळवे,मिलिंद जमधडे,राहुल धिलपे,सचिन शिंदे, अभिजीत कांबळे,आकाश हिवाळे, भरत कावळे,मनीष डक, मंगेश गायकवाड,विकास राठोड, योगेश गायकवाड,समीर गांगात्रिवे,क्रांती इंगोले,अनिल सुरडकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हेही वाचा : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करा, भाजप आमदार प्रशांत बंब यांची मागणी