Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा..." निकालावर मजेशीर मिम्स, वाचा...

“कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा…” निकालावर मजेशीर मिम्स, वाचा…

Subscribe

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. पण आता या निकालावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडू लागला आहे. राज्यातील सर्वोच्च निकालाबाबत सोशल मीडियावर मात्र मज्जा घेण्यात येत आहे.

महाविकास आघाडीची राज्यात असताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि राज्यातील सरकार कोसळल्याने मोठा भूकंप झाला. त्यानंतर हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचले. या प्रकरणावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सलग सुनावणी करण्यात आली आणि या सुनावणीवर आज दीड-दोन महिन्यानंतर महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. एकनाथ शिंदे – फडणवीस सरकराला मोठा दिलासा दिला आहे. मात्र कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले आहेत. तर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. पण आता या निकालावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडू लागला आहे. राज्यातील सर्वोच्च निकालाबाबत सोशल मीडियावर मात्र मज्जा घेण्यात येत आहे. (Memes on social media after the Supreme Court verdict)

वाचा… असेच काहीसे मजेशीर मिम्स

- Advertisement -

“Surgery successful, patient died‌… अशी उद्धव पक्षाची अवस्था”


Moral of the story
मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर
एकमेकांची पसंती बेकायदेशीर
साखरपुडा बेकायदेशीर
लग्न बेकायदेशीर
पण झालेले बाळ मात्र कायदेशीर…


- Advertisement -

इमारत पूर्णतः बेकायदा आहे, मालक बेकायदा आहे, आर्किटेक्ट बेकायदा, बांधणाऱ्यांनी ते बेकायदा बांधलंय…..
पण पाडायची की नाही ते बांधणारे ठरवतील!
– सर्वोच्च निवाडा


व्हीप सुनिल प्रभूंचा योग्य आणि सरकार शिंदेच योग्य…
🤣
कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा.


#आजचा_निकाल:
बाॅलरनी बॅट्समनना नोबॉल टाकला. कप्ताननी अंपायरकडे खोटी अपील केली. अंपायर यांनी चुकीचा निर्णय देत आऊट दिले आणि अशाप्रकारे नोबॉलवर बॅट्समनची विकेट गेली.
पण थर्ड अंपायरचा निर्णय येईपर्यंत बॅट्समन मैदान सोडून गेले. त्यामुळे आता त्यांना परत बॅटिंगला बोलवता येणार नाही. ते मैदानावरच असते, तर त्यांना परत बॅटिंग करायला लावली असती. आता उरलेली मॅच कंटिन्यू करा, असं थर्ड अंपायर म्हणतात… 🤣🤣


तुम्ही चूक तुम्ही घेतलेले निर्णय चुक आणि हे चुकीच्या निर्णयामुळे बसलेले सरकार मात्र बरोबर..


असे एक ना अनेक मिम्स आता व्हॉट्सअप, फेसबूक, इन्स्टाला शेअर करण्यात येत आहेत. कारण आजच्या निकाल वाचनाच्या सुरूवातीला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायाधीशांनी सुरूवातीला केलेले निकालाचे वाचन पाहता ठाकरे गटाला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु, अचानक 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याने सर्व काही उद्धव ठाकरेंच्या हातातील घास शिंदेंनी हिसकावून घेतल्याचे या निकालामुळे पाहायला मिळाले. ज्यानंतर सोशल मीडियावर मिम्सला सुरूवात झाली.

- Advertisment -