घरमहाराष्ट्रअल्झायमर रुग्णांसाठी राज्यात 'मेमरी क्लिनिक' सुरु!

अल्झायमर रुग्णांसाठी राज्यात ‘मेमरी क्लिनिक’ सुरु!

Subscribe

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक सुरु करून त्या माध्यमातून अल्झायमर विषयी ‘अर्ली डिटेक्शन सेंटर’ सुरु झाले आहे.

अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनासाठी राज्यातील २८ जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे २,२०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, ३०० रुग्णांवर स्मृतीभ्रंशाचे उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, जीवनकालावधी वाढत असल्याने देशभरात अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
देशात ४.१ दशलक्ष रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. याविषयी उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक सुरु करून त्या माध्यमातून अल्झायमर विषयी ‘अर्ली डिटेक्शन सेंटर’ सुरु झाले आहे. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. स्मरणशक्ती विषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केल्यानंतर रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतो.

स्मृतीभ्रंश आजारावर वेळीच औषधोपचारासाठी मेमरी क्लीनिक सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आजारासंबंधी तपासणी रोज केली जाते मात्र स्मृतिभ्रंश संबंधी आजाराच्या रुग्णांची आठवड्यातून दोन दिवस तपासणी केली जाते. आतापर्यंत रायगड, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, नाशिक, सिंधुदूर्ग, वर्धा, नंदूरबार, सातारा, चंद्रपूर, पुणे, ठाणे, नागपरू, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, औरंगाबाद, जालना, पिंगोली, लतूर, बीड, नांदेड, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामंध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत.– आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

या क्लिनीकमध्ये रुग्णांना शारीरीक व मानसिक व्यायाम आणि विविध खेळ देखील त्यांना शिकविले जातात. विशेष म्हणजे स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यायची याविषयी त्यांच्या नातेवाईकांना मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येते. आरोग्यमंत्री शिंदे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -