घरताज्या घडामोडीनाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच, डिसेंबरमध्ये चाचणी

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच, डिसेंबरमध्ये चाचणी

Subscribe

प्रवाशांचा वेळ आणि पैसाही वाचणार, कल्याणपर्यंतची सर्व स्थानके लोकलमुळे होणार कनेक्ट

नाशिक – अनेक दिवसांपासून नाशिककरांची मागणी असणारी नाशिक ते कल्याण लोकल सेवेची चाचणी येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. यामुळे कनेक्टिव्हीटीला चालना मिळणार असून नाशिक ते कल्याणपर्यंत असणारी सर्व स्थानके या लोकलमुळे कनेक्ट होणार आहेत. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी सामान्य नागरिक नोकरदार यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस उलटत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली.

- Advertisement -

नाशिक-कल्याण लोकसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले. त्यांनी लोकसभेत ही मागणी लावून धरली. त्यानंतर ही लोकल कुर्ला कारशेड येथे नेऊन ठेवण्यात आली होती. तिची अंतर्गत रचना दुरुस्त करण्यात आली. तिचे रूपडे बदलण्यासाठी ३२ कोटींचा खर्च करण्यात आला. या लोकलच्या चाचणीसाठीही ९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. आता डिसेंबरमध्ये तरी या चाचणीला मुहूर्त लागावा. ती यशस्वी व्हावी आणि नवीन वर्षात नाशिकरांना हे गिफ्ट मिळावे, अशी अपेक्षा सामान्यांना आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -