धुळे : मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला धुळ्यातील तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यश देवरे असं तरुणाचं नाव आहे. यश हा धुळ्यातील देऊर येथे राहणारा रहिवाशी आहे. धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता यशबाबत कंपनीकडे चौकशी केली असता, कंपनीने उडवाउडवीची उत्तर दिल्याचं समजतं. (merchant navy personnel from dhule missing in sea of oman no response from the company to the family)
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील देऊर येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. यश हा ठाण्यातील स्वराज सर्विस प्रायवेट लिमिटेडमध्ये ओएस पदावर काम करत आहे. कंपनीच्या कामासाठी यश सौदी अरेबियातील ओमान येथे गेला होता. त्यावेळी 28 जानेवारी रोजी यश आणि त्याच्या कुटुंबीयांचं बोलणं झालं. मात्र, त्यानंतर त्याच्याशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क झाला नाही.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 29 जानेवारीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजातून पाय घसरून पडला असून बेपत्ता झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला आहे.
परिणामी मुलाच्या चिंतेत असलेल्या कुटुंबीयंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीत गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय, नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधात असून एमटी अथेना 1 हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते. मात्र, हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची म्हटलं आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : बेड्या घालून घुसखोरांना परत पाठवत अमेरिकेनं भारताची इज्जत दाखवून दिली – संजय राऊत