घरठाणेडोंबिवली एमआयडीसीत इमर्जन्सी कंट्रोल व्हॅन, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

डोंबिवली एमआयडीसीत इमर्जन्सी कंट्रोल व्हॅन, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

Subscribe

डोंबिवली – कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) संघटनेने औद्योगिक विभागात होणारे अपघात व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी अशी इमर्जन्सी कंट्रोल सेंटरची (Emergency Control Van) निर्मिती केली आहे. आपात्कालीन  परिस्थितीत मदत मिळविण्याच्या दृष्टीने असे कंट्रोल सेंटर खूप फायद्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर उद्योजकांनी वेळीच आपल्या कारखान्यांचे फायर ऑडिट आणि १०० टक्के प्रदूषणमुक्त विभाग अशी काळजी घेतली तर येथील कंपन्या अन्यत्र हलवा असा विषय समोर येणार नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. (Emergency Control Van at Dombivli MIDC inaugurated by Ravindra Chavan)

हेही वाचाअखेर ‘रायगडा’वर रवींद्र चव्हाणांची स्वारी, मंत्र्यांचे बंगलेवाटप जाहीर

- Advertisement -

कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Kalyan Ambernath Manufacturers Association) तथा कामाच्या इमर्जन्सी कंट्रोल व्हॅनचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी कामाचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी, डॉ. कमल कपूर, नारायण माने, कामाचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी चव्हाण पुढे म्हणाले की, औद्योगिक विभागात रासायनिक सांडपाणी प्रदूषण, हवेतील प्रदूषण, कंपनीत लागणारी आग या घटना कायम चर्चेचा विषय असतात. यावर देखरेख आणि अपघात रोखण्यासाठी अशा प्रकारच्या उपकरणाची गरज होती. कामाने पुढाकार घेऊन केल्याने त्याचे कौतुकच आहे. सर्व उद्योजकांनी आपल्या उद्योगाचे शंभर टक्के फायर ऑडिट करून घेतले तर अपघातच होणार नाहीत. तसेच भविष्यात परिस्थिती उद्भवली तर या कामाच्या नव्या निर्मितीमुळे त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

हेही वाचा ‘पुढे दरोडा पडलाय, सोने काढून ठेवा’; मुंब्य्रात तोतया पोलिसांचा सुळसुळाट

- Advertisement -

यावेळी कामाचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी म्हणाले की, कामा सेंटरच्या माध्यमातून बनवलेली व्हॅनही अपघात स्थळी जाऊन आग विझविण्यासाठी मदत करू शकते. या व्हॅनमध्ये आधुनिक पद्धतीचे यंत्रसामुग्री असून तत्परतेनी व्हॅन घटनास्थळी पोहचून मदत करेल. असेच एक सेंटर ठाण्याला आहे पण ठाण्यावरून मदत पोहचे पर्यंत आग लागलेली कंपनी खाक होऊन जाईल. दुर्घटना आटोक्यात आणणे महत्वाचे असते. जर ती दुर्घटना हाता बाहेर गेली तर संपूर्ण कंपनी बेचिराख होऊन जाईल. त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली तर या सेन्टरच्या मदतीने आपण तिला लवकर आटोक्यात आणू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत उद्योजकांसाठी अशी व्हॅन वरदान ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -