Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्यात कोरोनाच्या सोबतीलाच आता अवकाळी पावसाचे सावट; हवामान खात्याचा इशारा

राज्यात कोरोनाच्या सोबतीलाच आता अवकाळी पावसाचे सावट; हवामान खात्याचा इशारा

राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली.

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिक चिंतेत पडला आहे. एकीकडे कोरोनाच सावट गडद असताना आता त्याच्यासोबतीला अवकाळी पावसाचे सावट देखील आले आहे. मागील आठवड्यापासून राज्यात तापमानाचा पारा घसरल्यामुळे मुंबईसह पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोनामुळे व्यापार ठप्प झालेला असताना दुसरीकडे पावसामुळे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कांदा आणि द्राक्षे पडून आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच आजही महाराष्ट्रातले हवामान काही अंशी ढगाळ राहणार आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा खाली जाताना दिसत आहे. कोकण विभागातील हवामान स्थिर असून तापमानाचा पारा सरासरी तापमानाच्या खाली गेला आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही हे पावसाचे सावट गडद असल्याचे दिसून येत आहे. तसेच पुढील काही दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

नाशिकसह मराठवाड्यातही अवकाळी पाऊस होणार

नाशिकसह मराठवाड्यातही अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. तर गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना अवकाळी पावासाने झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील काही दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असून पावसापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ‘लॉकडाऊन’ केले तर पॅकेज मिळालेच पाहिजे; शेवटी पैसा जनतेचाच आहे, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया


 

- Advertisement -