घरमहाराष्ट्रहवामान खात्याचा अंदाज चुकला; "तो" मुसळधार बरसला

हवामान खात्याचा अंदाज चुकला; “तो” मुसळधार बरसला

Subscribe

हवामान खात्याने गुरुवारसाठी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. "तो" अंदाज गुरुवारी पावसाने खोटा ठरवला. सायंकाळी ४ नंतर पावसाने जोरदार बरसात केली. तब्बल दोन तास पाऊस बरसला. मात्र नंतर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी झाला

मुंबई : सध्या पावसाचे आणि राजकारणाचे समीकरण एकसारखे झाल्याचे जाणवते. राजकारण बदलत चालले आहे. तर दुसरीकडे हवामानही बदलत चालले आहे. त्याचाच प्रत्यय म्हणजे की, हवामान खात्याने गुरुवारी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज २४ तासांपूर्वी वर्तवला असताना गुरुवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. आकाशातील पावसाळी काळ्या ढगांची गर्दी व जोरदार पाऊस बघून मुंबईकरांच्या उरात धडकीच भरली होती. मात्र सायंकाळी ६ नंतर पावसाचा जोर थोडा ओसरला.

मुंबई, महाराष्ट्रासह केंद्रातील राजकारण कधी बदलेल ते सांगता येत नाही. तसेच राजकारण खेळणारे नेतेमंडळी कधी, कोणती भूमिका घेतील, हे तज्ज्ञांनाही सांगता येणार नाही. तर लहरी पावसाबाबत हवामान खात्यालाही निश्चितपणे काही सांगता येत नाही. त्यामुळेच हवामान खात्याने गुरुवारसाठी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. “तो” अंदाज गुरुवारी पावसाने खोटा ठरवला. सायंकाळी ४ नंतर पावसाने जोरदार बरसात केली. तब्बल दोन तास पाऊस बरसला. मात्र नंतर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी झाला.

- Advertisement -

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा पुढील २४ तासांत शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहून संध्याकाळ आणि रात्री मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी मुसळधार पाऊस पडत असताना शहर व उपनगरात ४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या ४ ठिकाणी झाड/ फांदी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई शहर भागात ८.२३ मिमी, पूर्व उपनगरात – २७.६६ मिमी तर पश्चिम उपनगरात – १९.७२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. सर्वात जास्त पाऊस पूर्व उपनगरात पडला. विक्रोळी पार्कसाईट येथे -: ५१.०५ मिमी, घाटकोपर – ४७.२३ मिमी, कुर्ला – २९.७१ मिमी, भांडुप – ३७.८५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तसेच,पश्चिम उपनगरात – अंधेरी – ३६.८३ मिमी, मरोळ – ३६.३८ मिमी, कूपर रूग्णालय – २९.८८ मिमी, तर शहर विभागात – दादर – १८.२९ मिमी, वडाळा – १६.५१ मिमी, रावळी कॅम्प – ३०.४८ मिमी, ग्रँट रोड – ८.६३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा: जी. एन. साईबाबा प्रकरणात हायकोर्टाच्या निर्णयाला सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -