घरमहाराष्ट्रराज्यात थंडीचा जोर वाढणार!

राज्यात थंडीचा जोर वाढणार!

Subscribe

विदर्भाचा पारा १०° पर्यंत घसरणार

राज्यात २० जानेवारीपासून पुन्हा एकदा थंडीचा लाट पसरणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पार १४ अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातही काही ठिकाणी पारा १० पर्यंत खाली घसरणार असल्याने थंडीचा अनुभव पुन्हा विदर्भात अनुभवता येणार आहे. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात तर मुंबई ठाण्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.  २२ व २३ जानेवारीनंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई व परिसरातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंड वाऱ्यांच्या प्रभाव जाणवत नाही. राज्याच्या काही भागात किमान तापमानात घट झाली आहे, तर काही भागात पारा वर गेला आहे.

मराठवाड्याच्या बऱ्याच भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. येत्या दोन तीन दिवसात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -