घरमहाराष्ट्रपुण्याच्या सिम्बॉसिसमध्ये #MeToo चे वादळ

पुण्याच्या सिम्बॉसिसमध्ये #MeToo चे वादळ

Subscribe

पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालय सिम्बॉसिसमध्ये देखील Me Too ची लाट.

सध्या मोठ्या प्रमाणात #MeToo चे वादळ सुरु झाले आहे. भारतात Me Too ची चळवळ तनुश्रीने आणली आहे. त्यानंतर संपूर्ण जगात Me Too हा हॅशटॅग व्हायरल झाला आहे. हा हॅशटॅग वापरुन सिनेजगतातील अनेक अभिनेत्री समोर आल्या असून त्यांच्याशी झालेल्या लैंगिक शोषणाविषयी उघडपणे बोलू लागल्या आहेत. आता या पाठोपाठ पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालय सिम्बॉसिसमध्ये देखील Me Too ची लाट आल्याची पाहायला मिळत आहे. सिम्बॉसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधूनही लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयांतील काही आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांविरोधात समाजमाध्यमांमध्ये लिहिले असून, या प्रकारांबाबत तक्रारी करुनही कोणतही कारवाई केली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

तक्रार करुनही कारवाई नाही

पुण्यातील सिम्बॉसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन हे माहाविद्यालय विमाननगर येथे आहे. या महाविद्यालयातील १० पेक्षा अधिक माजी विद्यार्थीनींनी घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी ६ ऑक्टोबरपासून समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. एका माजी विद्यार्थीनींने तिच्या इंटर्नशिप दरम्यान तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याची कोणतीही दखल न घेतली नसल्याचा आरोप या विद्यार्थींनीने केला आहे.

- Advertisement -

फेसबुकवरुन मागीतली माफी

सिम्बॉसिस प्रशासनाने ८ ऑक्टोबरला एससीएमसीच्या फेसबुक सेजवर ‘ओपन लेटर’ लिहून माफी मागितली आहे. तसेच महाविद्यालयातील सध्याच्या आजी आणि माजी विद्यार्थीनींना पुढे येऊन अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रारी नोंदवण्याचे आणि सुधारणेसाठी सूचना करण्याचे आवाहन सिम्बॉसिस प्रशासनाने विद्यार्थ्यांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -