Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMetro Ticket : मेट्रोच्या व्हॉट्सॲप तिकीट सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद

Metro Ticket : मेट्रोच्या व्हॉट्सॲप तिकीट सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद

Subscribe

मेट्रो 2 अ म्हणजेच अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मेट्रो 7 गुंदवली ते दहिसर या मार्गावरून प्रवास करणारे 56 टक्के प्रवासी हे डिजिटल माध्यमातून झटपट तिकीट काढून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कागदी तिकिटांचा वापरात घट झाली असून त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळाली आहे.

मुंबई : सध्या सर्वत्र ऑनलाईन पद्धतीचे व्यवहार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे, की दहा रुपयांचे पेमेंट सुद्धा लोक आता गुगल पे किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने करत असतात. काही वेळेस हे आपल्याला घातक देखील ठरते. मात्र, जसे या ऑनलाईन पद्धतीचे काही तोटे आहेत तसेच फायदे देखील आहेत. कारण सध्या ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढून लोक आपला वेळ वाचवू शकतात. तसेच मेट्रोच्या व्हॉट्सॲप तिकीट सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मेट्रो 2 अ म्हणजेच अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मेट्रो 7 गुंदवली ते दहिसर या मार्गावरून प्रवास करणारे 56 टक्के प्रवासी हे डिजिटल माध्यमातून झटपट तिकीट काढून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कागदी तिकिटांचा वापरात घट झाली असून त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळाली आहे. (Metro ticket booking on whatsapp app)

हेही वाचा : Mahesh Sawant : शिवसेनेचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

- Advertisement -

दहा पंधरा मिनिटे तिकिटाच्या रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये, यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने डिजिटल तिकीट सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच कागदी तिकिटांचा वापर कमी होऊन पर्यावरणाची हानी कमी करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी एनसीएमसी कार्ड आणि महामुंबई मेट्रो ॲप यांच्याद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध केल्याचे समोर आले आहे. तसेच गेल्या महिन्यात महामुंबई मेट्रोने व्हॉट्सॲप तिकीट सेवाही सुरू केली आहे.आनंदाची बातमी म्हणजे एका महिन्यात या तिकीट प्रणालीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून डिजिटल तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण एका महिन्यात 10 टक्क्यांनी वाढले आहे.

हेही वाचा : Delhi Assembly Election 2025 : ‘आप’ची मदार महिला मतदारांवर; महाराष्ट्र पॅटर्न राबवणार

- Advertisement -

महामुंबई मेट्रोच्या व्हॉट्सॲप तिकीट सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यात 1 ते 24 नोव्हेंबर या 24 दिवसांत चार लाख 48 हजार प्रवाशांनी व्हॉट्सॲप तिकिटाच्या आधारे मेट्रोतून प्रवास केला आहे. तसेच कामकाजाच्या वेळेत दररोज 20 हजार ते 25 हजार प्रवाशांकडून व्हॉट्सॲप तिकीट प्रणालीचा वापर होत आहे. महामुंबई मेट्रोने आतापर्यंत दोन लाख 56 हजार मुंबई वन कार्डची विक्री केली आहे. तर यामधील रोज एक लाख 25 हजार प्रवाशांकडून या कार्डचा वापर केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -