घरमहाराष्ट्रMHADA, MPSC Exam : म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, 'या' दिवशी होणार...

MHADA, MPSC Exam : म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा

Subscribe

राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबतचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. अशातच या स्पर्धा परीक्षांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नव्या माहितीनुसार, राज्यात २९ जानेवारी रोजी म्हाडा आणि एमपीएससीची परीक्षा होणार आहे. पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर म्हाडाने परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार २९ जानेवारी रोजी म्हाडाची परीक्षा होणार आहे. मात्र त्याचदिवशी एमपीएससीची परीक्षादेखील होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

२९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीला म्हाडाची परीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारीला एमपीएससीच्या पोलीस निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचदिवशी म्हाडाच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दोन्ही परीक्षा नियोजन करणाऱ्या संस्थांनी परीक्षांचा तारखा जाहीर करताना इतर विभागाचं वेळापत्रक लक्षात घेतलं नाही असा आरोप केला जातोय. राज्यभरात २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान ५६५ जागांसाठी म्हाडाची परीक्षा घेतली जाणार आहे. तर म्हाडा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एमपीएससीची पीएसआय मुख्य परीक्षा देखील होत आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

- Advertisement -

म्हाडाने १२ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान परीक्षांचे नियोजन केले होते. मात्र यादरम्यान पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र आता नव्या वेळापत्रकानुसार म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -