मुंबईतल्या घराचं स्वप्न म्हाडाकडून होणार पूर्ण, ४ हजार ८३ घरांसाठी अर्ज भरण्याला सुरुवात

MHADA
`

मुंबईत आपलं छोटसं घर असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ते काही जणांना आर्थिकदृष्टया परवडेल असं नाही. परंतु म्हाडाने ४ हजार ८३ घरांसाठी आजपासून अर्ज भरण्याला सुरूवात केली आहे. दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरूवात होणार आहे. तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही २६ जून असणार आहे.

म्हाडाच्या घरांची ऑनलाईन सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे. सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नयेत, असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे.

यंदाच्या संगणकीकृत सोडतीसाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये म्हाडाने नवीन बदल केले आहेत. ‘आयएचएलएमएस’ एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली संगणकीय सोडत प्रणालीचे २.० व्हर्जन आहे. म्हाडाने घरांची सोडत मानवी हस्तक्षेपाशिवाय १०० टक्के पूर्ण करण्यासाठी बदल केले आहेत.

कसा करायचा ऑनलाईन अर्ज

1) आधी म्हाडाच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.

2) तुमची माहिती, उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्र तुम्हाला स्कॅन करून जोडणं आवश्यक आहेत.

3) अनामत रकमेचा भरणा बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करण्यासाठी २८ जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.

4) प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 4 जुलै रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in वेबसाईटवर येणार आहे.

मुंबई मंडळाची शेवटची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ २१७ घरांचा समावेश होता. परंतु मुंबई मंडळाच्या कार्यक्षेत्रात घर सोडतीसाठी लॉटरी काढली गेली नाही. म्हणून मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. गेल्या दोन वर्षांपासून याकडे नागरिकांचे लक्ष होते. दरम्यान आता मुंबई मंडळाची सदनिकांसाठीची सोडत आजपासून जारी होणार आहे.

म्हाडामधील घरांची संख्या – ४०८३

अत्यल्प गट

२७९० घरं

अल्प गट

२७८८ घरं

मध्यम गट

१३९ घरं

१२० घरं


हेही वाचा : पत्राचाळ घोटाळा: Google ला पण माहितीये, नितेश राणेंनी उडवली राऊतांची