घरताज्या घडामोडीMhada ची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टव्हेअर कंपनीचा काळ्या यादीतला इतिहास काय?

Mhada ची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टव्हेअर कंपनीचा काळ्या यादीतला इतिहास काय?

Subscribe

म्हाडाच्या परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणात ठपका असणारी कंपनी जी ए सॉफ्टव्हेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड ही पहिल्यांदा राज्यात परीक्षा घेणारी कंपनी नाही. याआधीही अनेक परीक्षांमध्ये या कंपनीच्या सुमार कारभाराचा फटका हा विद्यार्थ्यांना बसला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अनेक परीक्षांमध्ये कंपनीचा गोंधळ याआधीही समोर आला आहे. एकदा कंपनीला ब्लॅकलिस्ट करूनही पुन्हा याच कंपनीवर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी विश्वास दाखवला. त्यामुळे याआधीही वादाची ठरलेली कंपनी म्हाडाकडून काळ्या यादीत टाकण्यात येणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

कंपनीचा याधीही काळ्या यादीत टाकल्याचा इतिहास

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून संगणकीय कामे व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची परीक्षा (एनएमएमएस), राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस), पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या चार परीक्षांसाठी जबाबदारी कंपनीवर सोपावण्यात आली होती. पण या सगळ्याच परीक्षांमध्ये जीएस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने मोठ्या प्रमाणात चुका केल्या. त्यामुळेच परीक्षा परिषदेची कार्यकारी समिती आणि वित्त समितीने कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव केला होता. या प्रकरणातील शिफारशीनंतर कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. पण कंपनीने या प्रकरणातील सुनावणीत क्लिन चिट मिळवली. कंपनीने केलेल्या चुका आणि घोळासह निकाल जाहीर करण्यात आले. त्यामुळेच महाराष्ट्र परीक्षा परिषदेची नाचक्की झाली. पण गेल्या काही दिवसांमध्ये १ लाख पोलीसांची परीक्षा याच कंपनीकडून घेण्यात आली. म्हाडाच्या ५६५ जागांसाठीच्या परीक्षेतही याच कंपनीला परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली. पण म्हाडाच्या परीक्षेच्या आधीच पेपर प्रिटिंगला जाण्याआधीच कंपनीच्या संचालकाने या पेपरची एक कॉपी आपल्याजवळ ठेवली. त्यामुळेच गोपनियतेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत या प्रकरणात सॉफ्टव्हेअर कंपनीच्या संचालकाला अटक झाली.

- Advertisement -

हे म्हाडाला टाळता आले असते

कंपनीचा पूर्व इतिहास पाहता म्हाडासारख्या महत्वाच्या प्राधिकरणाला या गोष्टीची पुनरावृत्ती टाळता आली असती. वारंवार कारभारात चुका असतानाही म्हाडाच्या प्रशासनाकडून या परीक्षेवरच विश्वास दाखवण्यात आला. त्यामुळेच या प्रकारासाठी नक्की कारणीभूत कोण अशीही शंका उपस्थित करण्यासाठी वाव आहे. म्हाडाच्या भरतीमध्ये टेक्निकल तसेच वाणिज्य क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात उमेदवारांची भरती होती. अशा परीक्षांसाठी आयबीपीएस किंवा एमपीएससी मार्फतही परीक्षा घेणे म्हाडाला अशक्य झाले नसते. पण म्हाडाकडून मात्र वादग्रस्त अशा कंपनीवरच विश्वास दाखवण्यात आला.

जी एस सॉफ्टव्हेअर कंपनीची कुंडली

महाराष्ट्रात या कंपनीचा रेकॉर्ड चांगला नसला तरही भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर जी एस सॉफ्पटव्हेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीकडे मोठ्या प्रमाणात क्लायंट्स आहेत. २०१० मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचे विप्रो, टाटा, इंडियन एअरफोर्स पासून मलेशियाच्या शिक्षण मंत्रालयासारखे क्लाएंट्स आहेत. तर कंपनीच्या सेवा सात देशांमध्ये आहेत. आतापर्यंत कंपनीने २५० हून अधिक प्रकल्प पुर्ण केले आहेत. तर २०० हून अधिक कंपन्यांना कंपनीकडून सेवा देण्यात आली आहे. त्यामध्येच राज्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचाही समावेश आहे. पण म्हाडाच्या परीक्षेच्या निमित्ताने मात्र राज्यातील परीक्षेच्या कारभाराचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या परीक्षेतही न्यासा कंपनीचा गोंधळ

याआधी न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडला आरोग्य विभागाच्या भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. या कंपनीवर परीक्षा घेण्यासाठी योग्य व्यवस्थापन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. २४ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या परीक्षेत योग्य व्यवस्थापन न केल्याबाबत आरोग्य विभागाच्या सहसंचालकांनी कंपनीला नोटीस पाठवली होती. त्यामध्ये प्रश्नपत्रिका वेळेत न पोहचणे, चुकीचे पेपर देणे, परीक्षेसाठी आसन व्यवस्था निर्माण न करणे आणि परीक्षेआधीच पेपर फुटल्यामुळेच ही नोटीस पाठवली होती. अनेक ठिकाणी मोबाईल जॅमर न बसवल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर या पेपरफुटीच्या प्रकरणात काही जणांवर अटकेची कारवाईही झाली.


Mhada Exam: जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्यांची निदर्शनं, पोलिसांनी काही जणांना घेतलं ताब्यात

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -