घरमहाराष्ट्रम्हाडा घरांच्या सोडतीवर उद्या निर्णय अपेक्षित

म्हाडा घरांच्या सोडतीवर उद्या निर्णय अपेक्षित

Subscribe

म्हाडाच्या घरांच्या सोडतीला मुदतवाढ मिळण्याची चिन्हे असून मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या सोडत प्रक्रियेवर मुदतवाढीवर मंगळवारी बैठक होणार असून या बैठकीत स्पष्ट होणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता आता निवडणुकीचे कारण पुढे करत या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील २१७ घरांसाठी आठवड्याभराच्या कालावधीत अवघे १५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. पवई आणि चेंबूर सहकार नगर येथील सदनिका म्हाडाच्या मुंबई मंडळाने यंदाच्या सोडत प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिली आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय हा जाहीर करण्यात येईल, असे म्हाडा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या सोडत प्रक्रियेवर मुदतवाढीवर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत स्पष्टता येईल, अशी प्रतिक्रिया म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

म्हाडाच्या घरांच्या सोडतीला मुदतवाढ मिळावी

म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेत निवडणुक आचारसंहितेचा अडसर येणार नाही, असे स्पष्टीकरण म्हाडातील अधिकाऱ्यांकडून तसेच अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडून याआधी देण्यात आले होते. पण आता म्हाडा प्रशासनाने या प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली आहे. उपाध्यक्षांकडे मुदतवाढीबाबतची फाईल दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच मुदतवाढीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही मुदतवाढ किती असेल याबाबतचा खुलासाही लवकरच म्हाडाकडून होणार असल्याचे कळते. सध्याच्या मुंबई मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे घरांसाठीचा अर्ज दाखल करणे आणि अनामत रक्कम भरणे यासाठी १३ एप्रिलची डेडलाईन आहे. तर म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत ही २१ एप्रिलला काढण्यात येईल. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहरातील मतदान २९ एप्रिलला आहे. त्यामुळेच ही मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे कळते. तर लोकसभा निवडणुकांसाठी मतमोजणी ही २३ मे रोजी आहे. २७ मे रोजी आचारसंहिता शिथील करण्यात येईल. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेसाठी किती मुदतवाढ देण्यात येणार याबाबतचा खुलासा लवकरच होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

वाचा – निवडणुकांचा फटका म्हाडा लॉटरीला; घरांची सोडत लांबणीवर

वाचा – मुंबईतील ५०० फुटांच्या घरांना करमुक्ती; SRA चे रखडलेले प्रकल्प म्हाडा राबवणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -