घरताज्या घडामोडीMhada Lottery 2021 : नोंदणीसाठी उरले दोन दिवस, म्हाडा घरांसाठी २ लाख...

Mhada Lottery 2021 : नोंदणीसाठी उरले दोन दिवस, म्हाडा घरांसाठी २ लाख ३४ हजार अर्ज

Subscribe

म्हाडाच्या कोकण मंडळाअंतर्गतच्या ८९८४ घरांसाठी अर्ज नोंदणीसीची २९ सप्टेंबर शेवटची संधी आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता ही नोंदणीची मुदत संपेल. तर नोंदणी झालेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे. म्हाडाने याआधीच नोंदणी आणि अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. येत्या १४ ऑक्टोबर रोजी या लॉटरीची सोडत निघणार आहे. (Mhada lottery 2021 couple of days remained for new deadline)

म्हाडाच्या ८९८४ घरांसाठी आतापर्यंत एकुण २ लाख ३४ हजार ८२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ लाख ६८ हजार ५१९ जणांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण केली आहे. तर एकुण १ लाख ९२ हजार ६४८ जणांनी या अर्जासोबतची अनामत रक्कम भरली आहे.

- Advertisement -

घरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध ?

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत सदनिकांच्या विक्री यंदाच्या लॉटरीत उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत ६ हजार १८० सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२४ सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ५८६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १६२ खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे २०१६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथे १७६९ सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे ११८५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

- Advertisement -

कुठे किती घरे ?

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) १५ सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील १ हजार ७४२ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथील ८८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे ३६ सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे २ सदनिका, सर्व्हे क्रमांक २१६ पीटी, २२१ पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे १९६ सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक ४९१, २३ पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे १ सदनिका सोडतीत आहे.

याशिवाय २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे ८, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे ७६ सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे २३ सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) १६ सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे २ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे १६ सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे ११६ सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे ३५ सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे २८ सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे १४० सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे २१ सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे २४ सदनिका, अगासन-ठाणे येथे ४७ सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२ सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ११ येथे ४० सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ८ येथे ५१ सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे ६८ सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे २० सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

काय आहे उत्पन्नाची मर्यादा ?

कोंकण मंडळाच्या सन २०२१ च्या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी दि. ०१/०४/२०२० ते दि. ३१/०३/२०२१ या १२ महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५,००१ हजार रुपये ते ५० हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ५०,००१ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत ५ हजार रुपये इतकी अनामत रक्कम भरावयाची आहे. तसेच अल्प उत्पन्न गटाकरीता १० हजार रुपये, तर मध्यम उत्पन्न गटातील अर्जदाराला १५ हजार रुपये व उच्च उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर सर्व अर्जदारांच्या अनामत रकमेचा त्यांच्या खात्यामध्ये परतावा केला जाणार आहे. तसेच या सोडतीकरिता ५६० रुपये प्रति अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.

सोडतीचा दिनांक ?

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी याअनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.


हेही वाचा – Mhada Lottery 2021 : 10 लाखांमध्ये मुंबईनजीक घर, म्हाडाची कुठे किती घरे ?


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -