घरताज्या घडामोडीMhada lottery 2021 : रजिस्ट्रेशन, घरांची उपलब्धतता, पात्रता एका क्लिकवर

Mhada lottery 2021 : रजिस्ट्रेशन, घरांची उपलब्धतता, पात्रता एका क्लिकवर

Subscribe

अर्ज कधीपासून आणि कसा कराल ? पात्रता निकष काय ?

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे यंदा ८ हजार ९८४ घरांच्या विक्रीच्या सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात विविध भागात ही घरांची उपलब्धतता असणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावरूनच अर्ज कऱण्याची सुविधा आहे. म्हाडाने कोकण मंडळाच्या या लॉटरीची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर या घरांसाठीची लॉटरी दसऱ्याच्या दिवशी काढण्यात येणार आहे.

घरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध ?

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत सदनिकांच्या विक्री यंदाच्या लॉटरीत उपलब्ध आहेत.

- Advertisement -

ऑनलाईन अर्ज नोंदणीच्या तारखा

अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील व अर्ज नोंदणीची सुरवात २४ ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपासून होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट, २०२१ रोजीच दुपारी ३ वाजेपासून आपल्या ऐच्छिक सदनिकेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात करू शकतील. इच्छूक अर्जदार २२ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकतील आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ – २३ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अनामत रक्कमेच्या ऑनलाईन स्विकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ २४ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा २४ सप्टेंबर, २०२१ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत अर्जदारांना करता येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत ६ हजार १८० सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२४ सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ५८६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १६२ खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे २०१६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथे १७६९ सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे ११८५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

- Advertisement -

कुठे किती घरे ?

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) १५ सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील १ हजार ७४२ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथील ८८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे ३६ सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे २ सदनिका, सर्व्हे क्रमांक २१६ पीटी, २२१ पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे १९६ सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक ४९१, २३ पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे १ सदनिका सोडतीत आहे.

याशिवाय २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे ८, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे ७६ सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे २३ सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) १६ सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे २ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे १६ सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे ११६ सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे ३५ सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे २८ सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे १४० सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे २१ सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे २४ सदनिका, अगासन-ठाणे येथे ४७ सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२ सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ११ येथे ४० सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ८ येथे ५१ सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे ६८ सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे २० सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

काय आहे उत्पन्नाची मर्यादा ?

कोंकण मंडळाच्या सन २०२१ च्या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी दि. ०१/०४/२०२० ते दि. ३१/०३/२०२१ या १२ महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५,००१ हजार रुपये ते ५० हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ५०,००१ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत ५ हजार रुपये इतकी अनामत रक्कम भरावयाची आहे. तसेच अल्प उत्पन्न गटाकरीता १० हजार रुपये, तर मध्यम उत्पन्न गटातील अर्जदाराला १५ हजार रुपये व उच्च उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर सर्व अर्जदारांच्या अनामत रकमेचा त्यांच्या खात्यामध्ये परतावा केला जाणार आहे. तसेच या सोडतीकरिता ५६० रुपये प्रति अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.

सोडतीचा दिनांक ?

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी याअनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

 

 

 

mhada kokan board lottery 2021

 

mhada kokan board lotterry 2021


हे ही वाचा – गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची सेवा, असं आहे वेळापत्रक


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -