घरमहाराष्ट्रMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! मार्चमध्ये म्हाडाच्या...

MHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! मार्चमध्ये म्हाडाच्या 8 हजार घरांची लॉटरी

Subscribe

मुंबईत हक्काचं आणि स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण म्हाडा (MHADA)  प्राधिकारणाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या प्रत्येकी 4 हजार अशी एकूण आठ हजार घरांसाठी लॉटरी मार्च महिन्यात निघणार आहे. मुंबई मंडळाच्या सुमारे 4 हजार घरांपैकी 2 हजार 600 घरं ही गोरेगाव पहाडी परिसरात आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ही घरं बांधली जात आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची अंदाजे किंमत 35 लाख रुपये आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत याच घरांची किंमत अंदाजे 70 लाखांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. (MHADA Lottery 2023 )

गेल्याच महिन्यात म्हाडाच्या पुणे मंडळाच्या (mhada lottery pune 2022) घरांची लॉटरी जाहीर झाली. त्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मार्च महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी येत्या आठवड्याभरात जाहीरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे,

- Advertisement -

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत यंदा महत्वाची बाब म्हणजे, मार्च महिन्यात निघणाऱ्या या लॉटरीत अत्यल्प आणि अल्प आर्थिक उत्पन्न गटातील सर्वाधिक घर आहेत. विशेष म्हणजे ही घरे सर्व सुविधांनी सज्ज अशी असणार आहेत. तर मुंबईमधील उर्वरित ठिकाणांवरील घरांचा समावेशही मुंबई मंडळाच्या लॉटरीत केला जाणार आहे.

कोकण मंडळाची ही घरं ठाणे, वसई, विरार, पालघर, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यांत असणार आहेत. यात मुंबई मंडळाच्या लॉटरीत गोरेगाव पहाडी येथे सर्वाधिक घरांचा समावेश आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही आर्थिक उत्पन्न गटांसाठी याठिकाणी घरं बांधली जात आहेत. (register for MHADA lottery 2023)

- Advertisement -

घरांचा आकार, किंमत आणि गट

गोरेगाव पहाडी परिसरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 947 घरांचा समावेश आहे. ही घरं 322 चौरस फुटांची असून त्याची अंदाजे किंमत 35 लाख रुपयांपर्यंत आहे.

याच परिसरात अल्प उत्पन्न गटासाठी 736 घरं बांधली जात असून ही घरं 482 चौरस फुटांची आहेत. या घराची अंदाजे किंमत 45 लाख आहे.

गोरेगाव पहाडी परिसरात मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न आर्थिक गटांसाठीही घरं बांधली जात आहेत. यात उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरं बांधली जात असून त्याचा आकार 960 चौरस फुट एवढा आहे.
तर मध्यम उत्पन्न गटासाठी 227 घरं बांधली जात असून ती 800 चौरस फुट एवढी आहेत. 2025 सालच्या लॉटरीमध्ये या घरांचा समावेश केला जाणार आहे.

गेल्या वर्षीच्या लॉटरीच्या तुलनेत यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किमती या प्रतिचौरस फुटामागे एक ते दीड हजार रुपयांनी वाढल्या आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – शरद पवार येणार एकाच मंचावर; पुण्यातील ‘त्या’ कार्यक्रमास लावणार हजेरी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -