घरमहाराष्ट्रआव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं; सेनेच्या आमदाराची रोखठोक प्रतिक्रिया

आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं; सेनेच्या आमदाराची रोखठोक प्रतिक्रिया

Subscribe

टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या कॅन्सर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाटप केलेल्या सदनिकांना वितरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्थगिती दिली. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर आव्हाडांचा ड्रीम प्रोजेक्टला खिळ बसली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. तर आता अजय चौधरी यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कॅन्सरग्रस्तांसाठी इथे जागा दिली जात असली, तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्याविरोधात स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामुळे यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा केला. पत्र लिहिली, त्यांच्या पीएला भेटलो, पण मी मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत त्यांनी माझी दखल घेतली नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींना विचार न घेता हा निर्णय घेण्यात आला, असं अजय चौधरी यांनी सांगितलं.

- Advertisement -

आव्हाड काय म्हणाले?

“आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे,” असं म्हणत आव्हाड यांनी स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

पवारांच्या हस्ते चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १६ मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -