घरताज्या घडामोडीTaliye Landslide: तळीये गावाचा विकास म्हाडा करणार - जितेंद्र आव्हाड

Taliye Landslide: तळीये गावाचा विकास म्हाडा करणार – जितेंद्र आव्हाड

Subscribe

कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये हे महाड तालुक्यातील संपूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती असे सांगत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. त्यासोबतच तळीये गावातील घरे कशा प्रकारची असतील याचे संकल्पचित्रही आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावातील स्थानिकांशी बोलताना कोणत्याही प्रकारची मदत कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते. तसेच संपुर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असेही त्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

ळीये गावात बचाव आणि मदतकार्यासाठी आर्मी, नौदल, एअऱफोर्स अशा सगळ्या यंत्रणांची मदत आपण महाडच्या तळीये गावासाठी घेतली आहे. पण संपुर्ण गावावर आलेले संकटच अतिशय अवघड होते, आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि करतोय. पण तुमच्यावर स्वतःचे कुटूंबीय गमावल्याने आलेली परिस्थिती खरच अवघड आहे, तुम्ही स्वतःला सावरा, इतर गोष्टींची चिंता करू नका, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा असा दिलासा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये ग्रामस्थांना दिला. सर्व गावकऱ्यांचे सुरक्षित पुर्नवसन करण्यात येईल. तसेच कोणत्याही कागदपत्रांचा विचार करू नका, सरकार सर्व गोष्टींसाठी तुमच्या पाठीशी आहे. या सगळ्या गोष्टी सरकारवर सोडा असेही आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. मुख्यमंत्र्यांनी आज संपुर्ण महाड क्षेत्राचा दौरा करत दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट दिली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -