घरताज्या घडामोडीCET EXAM : पुरामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार, उदय सामंत...

CET EXAM : पुरामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार, उदय सामंत यांची माहिती

Subscribe

विद्यार्थ्यांची एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा असतील त्या पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील काही भागातील विद्यार्थ्यांना सीईटीच्या परीक्षेला पोहचता आले नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली होती. परंतु या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. पावसामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली असून मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला जबाबदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा सीईटीची परीक्षा देता येणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे की, राज्यात कालपासून फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश, विदर्भ, मराठवाडा पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्या विद्यार्थ्यांना कसलीही काळजी घेऊ नये. या सीईटी परीक्षा पुन्हा एकदा घेतल्या जातील, रजिस्ट्रेशन ज्यांचे ज्यांचे झाले आहे. त्यांच्या पुन्हा परीक्षा घेतील. या परीक्षांचे नियोजन पुन्हा एकदा करण्यात येणार असून विभागाला सूचना दिल्या आहेत. रजिस्ट्रेशन झालेल्या एकाही विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थीनेचे नुकसान होणार नाही याची पुर्ण दक्षता विभागाने घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देण्यात अडथळे आले. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा कक्षाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सीईटीच्या परीक्षा देता आल्या नाहीत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ग्रामीण भागातील नद्या -ओढ्यांना पूर आल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचता न आल्याने परीक्षेला मुकले आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांची एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा असतील त्या पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Goa Assembly Elections 2022: गोव्यात शिवसेना २२ जागांवर लढणार – संजय राऊत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -