CET EXAM: प्रवेशपूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर

तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 3 जून ते 10 जून 2022 यादरम्यान घेण्यात येणार आहेत.

exam

तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 3 जून ते 10 जून 2022 यादरम्यान घेण्यात येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 11 जून ते 28 जून 2022 यादरम्यान होणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 12 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. शिवाय अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वेळापत्रक शेअर केल्यानंतर “अभ्यासक्रमानुसार सीईटी परीक्षेचे माहितीपत्रक, वेळापत्रक, बदल आणि अभ्यासक्रम सीईटी वेबसाइटवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.” असं ट्विट करत म्हटलं आहे.

MAHA CET परीक्षा 2022 ची माहितीपत्रके, वेळापत्रक, बदल आणि सामायिक प्रवेश परीक्षांचे अभ्यासक्रम mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जारी केले जातील. कोविड-19 महामारीमुळे सरकारनं याआधीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022-23ला विलंब होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले.


हेही वाचा – आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार; बाकीचे पैसे जनतेच्या भल्यासाठी वापरणार – भगवंत मान

आरोप करणं ही विरोधकांची सवयच; महाराष्ट्र कधीही झुकणार नाही – आदित्य ठाकरे