घरताज्या घडामोडीMHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर

MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर

Subscribe

MHT CET परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. PCM गटातून 13 तर PCB गटातून 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. या परीक्षेचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तो सीईटीच्या अधिकृत संकेस्थस्थळावर पाहता येणार आहे.

MHT CET परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. PCM गटातून 13 तर PCB गटातून 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. या परीक्षेचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तो सीईटीच्या अधिकृत संकेस्थस्थळावर पाहता येणार आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली MHT CET परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतील 227 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. (mhtcet exam result declared)

विद्यार्थ्यांनी आपला निकाल cetcell.mahacet.org, mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली MHT CET परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतील 227 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने 13 दिवसात 25 सत्रामध्ये घेण्यात आली होती.

- Advertisement -

पीसीएम आणि पीसीबी या 2 गटांत झालेल्या या परीक्षेत पीसीएम गटातून 13 विद्यार्थ्यांना 10 पर्सेन्टाइल तर पीसीबी गटातून 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेन्टाइल गुण प्राप्त झाले आहेत.

एमएचटी सीईटी परीक्षेला पीसीएम गटाच्या परीक्षेसाठी 2 लाख 82 हजार 70 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 31 हजार 264 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि उपस्थितांची टक्केवारी 81.99 टक्के आहे.

- Advertisement -

पीसीबी गटासाठी 3,23,874 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 2,36,115 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीबी गटासाठी उपस्थिताची टक्केवारी 72.90 टक्के इतकी होती. पीसीएम गटाची सीईटी परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान पार पडली होती तर पीसीबी गटाची सीईटी परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती.

‘असा’ पाहा निकाल

  • mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेज समोर येईल.
  • होमपेजवरील स्कोर कार्ड लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

हेही वाचा – पाट्या टाकण्याचे काम करू नका; रवींद्र चव्हाणांच्या अभियंत्यांना कानपिचक्या

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -