घरदेश-विदेशविमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

मुंबई ते सिंगापूर जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या चौकशीला सहकार्य करत असल्याची माहिती सिंगापूर एअरलाइन्सने दिली आहे.

मुंबई ते सिंगापूर जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती फोनवरुन देण्यात आली. त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तसेच विमानातील पायलटला बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर तात्काळ पायलटने चांगी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करत प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

असा करण्यात आला होता दावा

सिंगापूर एअरलाइन्सचे एसक्यू विमान ४२३ वेळेनुसार ११.३५ मिनिटांनी मुंबईवरुन सिंगापूरसाठी उड्डाण घेतले. विमान उडल्यानंतर काही वेळात एअरलान्सला निनावी फोन आला. ‘या विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे’, असा दावा करण्यात आला. त्यानंतर तातडीने विमान चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले.

- Advertisement -

विमानात होते २६३ प्रवासी

हा निनावी फोन आल्यानंतर विमानाची आपत्कालीन लॅंडिंग मंगळवारी सकाळी ८ वाजता चांगी येथे करण्यात आली. या विमानात २६३ प्रवाशी प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरविण्यात आले. मात्र त्याआधी प्रवाशांनाही सुरक्षा यंत्रणांना सामोरे जावे लागले. सुरक्षा अधिकराऱ्यांनी या विमानातील एका महिलेला आणि मुलाला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

सिंगापूर एअरलाइन्सने या बातमीला दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले आहे की, मुंबईवरुन सिंगापूरला जाणाऱ्या या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. तसेच सिमगापूर एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमान वेळेनुसार सकाळी ८ वाजता सिंगापूरला पोहचले होते. तसेच निनावी फोन आल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या चौकशीला सहकार्य करत आहोत.


वाचा – वजन कमी करण्यासाठी प्रवासी झाला निवस्त्र, विमानतळावर खळबळ

वाचा – एकाच विमानावर पायलट मायलेकीचा फोटो व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -