शिंदे -फडणवीस यांची दिल्लीत अमित शहांसोबत मध्यरात्री खलबतं!

रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली बैठक तब्बल सहा तासांनी म्हणजेच मध्यरात्री अडीच वाजता संपली. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत या तीन नेत्यांमध्ये प्रदीर्घ खलबतं झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

amit shah devendra fadnavis and eknath shinde

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली बैठक तब्बल सहा तासांनी म्हणजेच मध्यरात्री अडीच वाजता संपली. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत या तीन नेत्यांमध्ये प्रदीर्घ खलबतं झाली असल्याचं म्हटलं जात आहे. (Midnight Meeting in delhi for maharashtra government)

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने राज्यात भाजप-शिंदे गटाची सत्ता आणली. राज्यातील राजकीय सत्तानाट्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने अद्यापही जाहीर भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, काल शुक्रवारी रात्री अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी तब्बल सहा तास चर्चा केल्याची म्हटलं जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळवर जिल्हा निहाय चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, ११ जुलै रोजी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या कायदेशीर लढाईबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा -आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, या भेटीचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना अमित शाह म्हणाले, “महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दोघेही पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा कराल आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाल.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ शकतो. तसेच हा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पहिल्या काही मंत्र्यांना शपथ दिली जाईल आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर दुसऱ्या टप्प्यात काही मंत्र्यांकडे मंत्रिपदाचा कार्यभार सोपवला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची संपूर्ण रूपरेषा तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 28 मंत्री केले जाणार असून, त्यापैकी आठ राज्यमंत्री असतील. भाजपकडे गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, ऊर्जा, ग्रामविकास, क्रीडा आणि महसूल या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय.

खरं तर दोन टप्प्यांत मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सगळीच खाती भरली जाणार नाही आहेत. दोन ते तीन मंत्रिपद रिक्त ठेवण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला जवळपास 15 मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, भाजप स्वतःकडे 28 मंत्रिपदे ठेवू शकते. त्यात शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपद मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.