Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पेठ तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

पेठ तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

३ रिश्टर स्केलची नोंद : दोन दिवसांपासून जाणवताहेत धक्के

Related Story

- Advertisement -

पेठ तालुक्यातील गावांना मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकपांची तीव्रता ३ रिश्टर स्केल असल्याची नोंद मेरीच्या भुकंपमापन केंद्रात झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावर सकाळी हे धक्के जाणवले. तालुक्यातील गोंदे, जोगमोडी, एकदरे, आसरबारी, मोहपाडा, जांभूळमाळ, हेदपाडा, कोहोर, पेठ, खोकरतळे, भायगाव आदी गावांना सकाळी ६ वाजून ५८ मि. ५३ सेकंदानी भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जमीन थरथरल्याच्या व पाठोपाठ आवाजाने नागरीकांमध्ये काहीशी भितीची जाणीव निर्माण झाली. धक्का सौम्य असल्याने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. नागरिकांनी घाबरून जाउ नये तसेच प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन संदिप भोसले यांनी केले आहे. नाशिकपासून ८० किलोमीटर पालघर परिसरातही १९ जुलै रोजी ३.३ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -