मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मिलिंद एकबोटे यांनी राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाबद्दल घेतलेल्या भूमिकेचे देखील कौतूक केलं आहे.

milind ekbote meets mns president raj thackeray
मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले मिलिंद एकबोटे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.  मिलिंद एकबोटे यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली असून, यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाबद्दल घेतलेल्या भूमिकेचे देखील कौतूक केले आहे. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, असे म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतूक केले आहे.

milind ekbote meets raj thackeray
मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

म्हणून मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्याच्या वढू बुद्रूक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. हा कार्यक्रम २४ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना मिलिंद एकबोटे म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराजांचे समाधीस्थान वढू बुद्रूक आहे. त्याठिकाणी २४ मार्चला संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावे आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावे अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

Milind Ekbote meets Raj Thackeray, Milind Ekbote meets, Raj Thackeray, mns president raj