घरमहाराष्ट्रशिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

Subscribe

मुंबई : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे काल निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज, बुधवारी संध्याकाळी 7 वाजता सांताक्रूझ पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

विद्या नार्वेकर यांच्या निधन झाल्याचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी, सनदी अधिकाऱ्यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करून सांत्वन केले. मागील दोन आठवड्यांपासून विद्या नार्वेकर या लीलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी मिलिंद नार्वेकर आईसोबत रुग्णालयात होते. त्यांच्या पश्चात मुलगा मिलिंद नार्वेकर, सून प्रा. मीरा नार्वेकर, कन्या रूपाली चाफेकर, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. आज दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या कालावधीत पाली हिल, वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी विद्या नार्वेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येईल.

- Advertisement -

माजी मंत्री उदय सामंत यांचे सांत्वनाचे ट्वीट

मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याचे समजल्यावर माजी मंत्री उदय सामंत यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या सांत्वनाचे ट्वीट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांचे आईवर अतोनात प्रेम होते, त्यांच्या जीवनात मातृप्रेमाची पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वराने द्यावी, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -