घरताज्या घडामोडीक्युआर कोड स्कॅनव्दारे लाखोंना गंडा

क्युआर कोड स्कॅनव्दारे लाखोंना गंडा

Subscribe

लॉकडाऊन काळात ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाली असून सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे. हायटेक चोरट्यांनी विविध वस्तू खरेदी करण्यास भासवून क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगत तब्बल ३ लाख ३७ हजार २४८ रूपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायटेक भामट्यांनी २५ एप्रिल ते २९ जुलै २०२० या कालावधीत तक्रारदाराच्या मोबाईल कॉल करत विविध वस्तू खरेदी करण्याचे भासवून वस्तूंचे पैसे पाठविण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्याच्या विश्वास ठेवून तक्रारदारांनी क्युआर कोड स्कॅन करताच तक्रारदारांच्या खात्या परस्पर ३ लाख ३७ हजार २४८ रूपये काढून घेतले. बँक खात्यावरून रक्कम गेल्याचे एसएमएस येताच फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोरसे करत आहेत.

- Advertisement -

सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

लग्नात मानपान, दागिने व हॉटेल व्यवसायासाठी माहेरहून ७ लाख रूपये न आल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना अस्मित हाईट्स, अशोकामार्ग येथे घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती तुषार सुधाकर दुसाने (३१, रा.अस्मित हाईट्स, मुंबई नाका) याच्यासह सासरच्या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात मानपान, दागिने व इतर वस्तू दिल्या नाहीत. पतीला हॉटेल व्यवसायासाठी ७ लाख रूपये माहेरहून आणावेत, अशी मागणी सासरच्यांनी विवाहितेकडे केली. त्यास तिने नकार दिला असता सासरच्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या एकाने तिचा विनयभंग करत शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करत आहेत.

दुचाकीवरून तोल गेल्याने महिलेचा मृत्यू

मेडीकल कॉलेजमध्ये रूग्णास जेवणाचे डबे दुचाकीवरून घेऊन जात असताना तोल जाऊन पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना औरंगाबाद रोडवरील गोदावरी लॉन्सजवळ घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. लिलाबाई राजू जाधव (४२, रा.रामदास स्वामी मंदिराजवळ, आगर टाकळी, गांधीनगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसाराम अक्षय जाधव यांच्या समवेत लिलाबाई जाधव दुचाकीवरून मेडीकल कॉलेजमध्ये रूग्णांसाठी जेवणाचे डबे घेवून जात होते. ते गोदावरी लॉन्सजवळ आले असता तोल गेल्याने त्या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारार्थ त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार थेटे करत आहेत.

- Advertisement -

वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याची घटना रविवारी (दि.९) रात्री १०.३० वाजेदरम्यान मेहरधाम गणपती मंदिराजवळ, एसटी डेपोसमोर, पेठ रोड येथे घडली. याप्रकरणी जयराम रघुनाथ पिंगळे (४८, रा. मखमलाबाद) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कन्हैया रघुनाथ पिंगळे (४६, रा.पिंगळेगल्ली, मखमलाबाद) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम पिंगळे यांचा भाऊ विनाहेल्मेट दुचाकी(एमएच १५-एफ आर-८६३०)वरून पेठरोडने जात होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल माळी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -