घरताज्या घडामोडीMIM च्या आमदारांनी बांगलादेशींना भारताचे नागरिकत्व मिळवून दिले; अतुल भातखळकर यांचा आरोप

MIM च्या आमदारांनी बांगलादेशींना भारताचे नागरिकत्व मिळवून दिले; अतुल भातखळकर यांचा आरोप

Subscribe

एमआयएम पक्षाच्या आमदारांच्या लेटरहेडचा वापर करुन बांगलादेशी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळवून दिल्याची धक्कादायक घटना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उघडकीस आणली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे, त्यांच्याकडून एमआयएम आमदारांचे कोरे लेटरहेड आढळून आले आहेत. MIM च्या आमदारांनी घातक खेळ केला असून या देश विघातक षडयंत्राची कसून चौकशी झाली पाहीजे, लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय? असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर विचारला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, “बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणारी एक टोळी आज मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून महाराष्ट्रातील एमआयएमच्या दोन आमदारांची सही असलेली लेटरहेड मिळालेली आहेत. कायम बेकायदेशीर आणि देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.”

- Advertisement -

 

- Advertisement -

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी आज अटक केलेल्या टोळीने एमआयएमचे आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांच्या लेटर हेडचा वापर करुन मुंबईसह, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह भारतातील विविध शहरांमध्ये बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरिता बनावट सरकारी दस्तावेज तयार करण्याचे काम सर्रासपणे करत होते. त्यांच्याकडे MIM च्या आमदारांची ७ कोरी लेटरहेडसुद्धा मिळाली आहेत. हा अतिशय घातक आणि धोकादायक प्रकार असून MIM च्या दोन्ही आमदारांना तात्काळ अटक करण्याची मागणी आमदार अतुल भातकळकर यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -