घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबाद नामांतराविरोधात MIMचं साखळी उपोषण; तर मनसेकडून स्वाक्षरी मोहीम

औरंगाबाद नामांतराविरोधात MIMचं साखळी उपोषण; तर मनसेकडून स्वाक्षरी मोहीम

Subscribe

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या नामांतराबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद या जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे. या निर्णयावरून औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावेळी औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेकडून ‘स्वाक्षरी मोहीम’ राबवली जात आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचं नाव हे औरंगाबादच ठेवावं, अशी येथील लोकांची तीव्र भावना आहे. यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकरण करत नाही आहोत. हे माझं शहर असल्यामुळे त्यासोबत माझी भावना जोडली गेली आहे. ही लोकशाही आहे, तुमची हुकुमशाही नाही, अशी प्रतिक्रिया देत जलील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

नामांतराच्या निर्णयाला एमआयएमने विरोध केल्यावर मनसेकडून जलील यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जलील रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असतील, तर आम्ही देखील आंदोलन करुन उत्तर देऊ, असा इशारा मनसेने दिला होता. दरम्यान जलील यांनी उपोषणाची घोषणा करताच मनसेकडून देखील स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, आज एमआयएमकडून नामांतराच्या विरोधात उपोषण केले जाणार असल्याने, पोलिसांनी याची दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी जलील यांच्याची चर्चा करत उपोषणाबाबत आढावा घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तुम्हीही कार्यक्रम करा, तुम्हाला कुणी आडवलंय?, महानाट्याच्या आयोजनावरून शेलारांचा विरोधकांना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -