घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये; आघाडी सरकार अडचणीत

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये; आघाडी सरकार अडचणीत

Subscribe

विधानपरिषदेचे मतदान झाल्यापासून हेवी वेट नेते, पक्षाचे विधीमंडळ नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते मागील १२ तासांपासून नॉट रिचेबल आहेत

शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून ते सध्या गुजरातच्या ली मेरिडिअन हॉटेलमध्ये आहेl. त्यांच्यासोबत १२ हून अधिक आमदार असून आता शिवसेनेत फूट अटळ आहे. या घडामोडींमुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्ली दौरा आटोपता घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे ली मेरिडिअन हॉटेलमध्ये असून त्या हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त आहे. यादरम्यान भाजपचे नेतेही एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप असून एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री गुजरातमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदार हे गुजरातमध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत असे समजते.

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीत भाजपची पुन्हा बाजी, प्रसाद लाड विजयी, तर चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव

शिवसेनेचे ५५ आमदार आणि सहयोगी आमदार ९ असे मिळून ६४ आमदार असते वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार २६ चा कोटा घेऊन काटावर विजयी झाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून शिवसेनेची १० पेक्षा जास्त मते फुटली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरची नाराजीच यातून दिसते.

- Advertisement -

विधानपरिषदेचे मतदान झाल्यापासून हेवी वेट नेते, पक्षाचे विधीमंडळ नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते मागील १२ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांचा गटचं शिंदेंना वारंवार डावलले जात असल्यामुळे अनेक आमदारांचे फोनही नॉट रिचेबल होते. शिवसेनेला फाटाफुटीपासून रोखण्यासाठी नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास एक बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेचे काही नेते आणि आमदार उपस्थित होते मात्र मंत्री एकनाथ शिंदे हजर नव्हते.


शिवसेनेत एकनाथ शिंदे नाराज, नॉट रिचेबल असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली बैठक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -