घरमहाराष्ट्रआंतरराष्ट्रीय दर्जाच्या रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्रामुळे वरळीचा नावलौकीक सातासमुद्रापार - आदित्य ठाकरे

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्रामुळे वरळीचा नावलौकीक सातासमुद्रापार – आदित्य ठाकरे

Subscribe

वरळी परिसरात रस्ते, पदपथ, उद्याने, विविध पायाभूत सुविधा, शाळा व इतर विकास कामांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास घडून येतो आहे. त्यामध्ये वरळी रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरणाची भर पडली आहे. १० मीटर रेंज उपलब्ध झाल्यानंतर आता २५ आणि ५० मीटर रेंजदेखील उपलब्ध केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या केंद्राचा नावलौकीक सातासमुद्रापार पोहोचेल, असा आत्मविश्वास राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

वरळी, जे. के. कपूर चौकाजवळ रायफल रेंज येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन संचलित शूटिंग प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात मुंबई महापालिकेने नूतनीकरण केलेल्या १० मीटर शूटिंग रेंजचे लोकार्पण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, शिवसेना खा. अरविंद सावंत, आ. सुनील शिंदे, माजी मंत्री सचिन अहिर, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, प्रख्यात नेमबाज तथा महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित, महासचिव शीला कानुनगो, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या माध्यमातून महापालिकेच्या जागेवर संचलित या रायफल रेंजमधील विविध रेंजचे नूतनीकरण गेली काही वर्ष प्रस्तावित होते. त्यापैकी, १० मीटर रेंजचे नूतनीकरण महापालिकेने पूर्ण केले आहे. या रेंजच्या जागेत नव्याने बनविलेले छत, विद्युत प्रकाश योजना यासह रेंजसाठी आवश्यक सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय मानकानुसार केलेल्या आहेत. अशोक पंडित, अंजली भागवत, सुमा शिरुर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी या केंद्रातून धडे गिरवले आहेत. आता २५ आणि ५० मीटर रायफल रेंजचे नूतनीकरण हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे वरळी रायफल रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणून नावाजले जाईल, असा आत्मविश्वास मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. क्रीडापटूंसह पोलीसांना देखील प्रशिक्षणासाठी या केंद्राचा मोठा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

जी/दक्षिण विभागातील लोअर परळमध्ये पांडुरंग बुधकर मार्गावर कै. महेश मधुकर बोभाटे मनोरंजन उद्यानाचे सुशोभीकरण देखील महापालिकेने केले आहे. त्याचे लोकार्पण देखील पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. याठिकाणी सुमारे २८ मीटर x २५ मीटर क्षेत्रफळाच्या जागेत क्रीडा केंद्रदेखील विकसित करण्यात आले आहे. त्यासोबत उद्यानात फेरफटका मारण्यासाठी सुशोभित मार्ग, भिंतीवर आकर्षक चित्रांसह रंगरंगोटी, विद्युत रोशणाई आणि सुशोभित दिवे अशा वैशिष्ट्यांसह या मनोरंजन उद्यानाचे देखणे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जी/दक्षिण विभागातीलच प्रभादेवी परिसरात गोखले रस्त्यावर क्राऊन मिल प्लॉट येथे बहुक्रीडा केंद्र विकसित करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

याप्रसंगी माजी नगरसेवक समाधान सरवणकर व इतर मान्यवर देखील उपस्थित होते. सुमारे २८.२५ मीटर x १४.३४ मीटर क्षेत्रफळाच्या या जागेत लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा खेळांसाठी सुविधा देण्यात आली आहे. त्यासोबत सुशोभित भिंती, सुशोभित विद्युत योजना देखील करण्यात आली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -