घरताज्या घडामोडीराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

Subscribe

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे.

उर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ताजी असतानाच आता शनिवारी (आज) राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी’, असे आवाहन देखील त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी २० हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाचा लोकप्रतिनिधींना मोठा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना कोरोनाचा सामना करावा लागला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे, अब्दुल सत्तार, सुनील केदार, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे यांना करोनाने गाठले तर प्रकाश सुर्वे, मुक्ता टिळक, वैभव नाईक, मकरंद पाटील, किशोर जोरगेवार, ऋतुराज पाटील, पंकज भोयर, माणिकराव कोकाटे, सुनील टिंगरे, किशोर पाटील, यशवंत माने, मेघना बोर्डीकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, रवी राणा, चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, अतुल बेनके, अभिमन्यू पवार, कालिदास कोळंबकर, माधव जळगावकर, महेश लांडगे, मोहन हंबरडे, मंगेश चव्हाण, गीता जैन, सरोज अहिरे, अमरनाथ राजूरकर तसेच विधान परिषद सदस्य गिरीश व्यास, सुजितसिंह ठाकूर, नरेंद्र दराडे आणि सदाभाऊ खोत यांनाही करोनाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात देश रसातळाला गेला’ ही तर फडणविसांची बौद्धीक दिवाळखोरी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -