धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांना अटक, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार महिला आणि तिचा पती अजयकुमार देडे हे उस्मानाबादचे रहिवासी आहे

After Karuna Sharma's arrest, he was remanded in judicial custody for 14 days

एका महिलेचा पती अजयकुमार देडे व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संबंधीत महिलेने केला होता. या प्रकरणामुळे आता करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आज दुपारी पुणे कोर्टासमोर करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार महिला आणि तिचा पती अजयकुमार देडे हे उस्मानाबादचे रहिवासी आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये तक्रारदार महिलेच्या पतीची ओळख करुण शर्मांसोबत झाले. यावेळी अजयकुमार वारंवार करुणा शर्मा यांच्या संपर्कात राहू लागला, यानंतर तक्रारदार महिला आणि तिचा पती पुण्यात येऊन स्थानिक झाले. महिलेचा पती हा वारंवार करुणा शर्मांच्याशी फोनवर बोलत होता.

यावेळी तक्रार महिलेच्या पतीने त्याचे करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ रोजी एका कार्यक्रमाला जायचे म्हणून तक्रार महिलेच्या पतीने तिला भोसरीला नेले. याठिकाणी पोहचताच तिचा पती आणि करुणा शर्मा यांनी हॉकीस्टीकचा धाक दाखवत महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी करुणा शर्मांसह तक्रारदार महिलेचा पती अजयकुमार देडे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.वसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक आरोप केल्यामुळे करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या.


ठाकरे सरकारमध्ये भूकंप; ठाणे, कोकण, मराठवाड्यातील 25 आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये