घरताज्या घडामोडीBabanrao Lonikar : महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी लोणीकरांच्या अडचणीत वाढ, ऊर्जामंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Babanrao Lonikar : महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी लोणीकरांच्या अडचणीत वाढ, ऊर्जामंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Subscribe

महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धमकावणे आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणं माजी मंत्री बबनराव लोणीकरांना चांगलेच महागात पडलं आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लोणीकरांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरल्यास आम्ही खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशाराच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लोणीकरांना दिला आहे. तसेच धमकी मिळालेल्या अधिकाऱ्याला गरज पडल्यास संरक्षण दिले जाईले असे नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. आक्षेपार्ह वक्तव्य आणि धमकीमुळे ऊर्जामंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या धमकीची दखल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतली आहे. लोणीकर यांच्या ध्वनीफितीबाबत दखल घेतली असून हा औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील धक्कादायक प्रकार आहे. यातील संवाद आणि वापरण्यात आलेली भाषा आक्षेपार्ह आहे. एका ज्येष्ठ नेत्याला आणि संवैधानिक पदाची जबाबदारी पार पाडलेल्या नेत्याला अशी भाषा शोभत नाही. स्वतःला संस्कारी पक्ष म्हणून घेणाऱ्या भाजपमधील एका नेत्याने वापरलेल्या भाषेमुळे पक्षाचा संस्काराचा बुरखा फाटला आहे. असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

लोणीकरांनी अधिकाऱ्यांची माफी मागावी

महावितरणच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रकार आहे. तसेच अधिकाऱ्यांना धमकी देऊन चुकीचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रकार लोणीकरांनी केला आहे. मागील काही काळापासून भाजप नेते मंत्री आणि आमदारांना ईडी, सीबीआयच्या कारवाईची धमकी देत होते आता नेते अधिकाऱ्यांनाही धमकी देत आहेत. नेत्यांनी अता धक्कादायक पातळी गाठली आहे. लोणीकरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. त्यांनी जे दलित वस्त्यांबाबत वक्तव्य केले ते अशोभनीय असून यावरुन त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते असा निशाणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी साधला आहे.

लोणीकर यांच्या आरोपांबाबत वस्तुस्थिती

दोन मीटरचे वर्षभरात १० लाख बिल भरले असे लोणीकर म्हणत असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी विजेचे बिल भरले नाही.

- Advertisement -

१. ग्राहक क्रमांक- ४९००१४८८९१०५

श्री. राहूल बबनराव यादव
हाऊस नं.५२, गट नंबर १४६, आलोक नगर, औरंगाबाद
पीन कोड- ४३०००१

वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- १८ जानेवारी २०२१

मार्च २२ अखेर एकूण थकबाकी- ३ लाख २१ हजार ४७०

सद्यस्थिती- वीज जोडणी खंडित केलेली नसून वीज पुरवठा अद्यापही सुरू आहे.

२. ग्राहक क्रमांक- ४९००११००९२३६

नाव- आय.एस. पाटील
पत्ता- प्लॉट नं.५५, गट नं.१४६, अशोकनगर जवळ, सातारा, औरंगाबाद
पिन कोड- ४३१००१

वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- २७ मार्च २०१९

मार्च २२ अखेर एकूण थकबाकी- ६७ हजार २०० रूपये.

सद्यस्थिती- वीज बिल थकल्याने वीज पुरवठा तात्पूरता खंडित केला आहे.

मा. लोणीकर हे १० लाख वीज बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास ४ लाख आहे.


हेही वाचा : मुंबईकरांच्या समस्या सोडवण्याला माझे प्राधान्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -