घरमहाराष्ट्रमंत्रिपद गेले तरी चालेल, पण शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, गुलाबराव पाटील कडाडले

मंत्रिपद गेले तरी चालेल, पण शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, गुलाबराव पाटील कडाडले

Subscribe

छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करु शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजारांवर बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. शिवरायांबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याला माफ केले जाणार नाही. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. मंत्रीपद गेलं खड्ड्यात, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्याचा तीव्र निषेध होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनाही या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर थेट मंत्रीपद सोडण्याचाही इशारा दिला आहे.

छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करु शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजारांवर बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. शिवरायांबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याला माफ केले जाणार नाही. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. मंत्रीपद गेलं खड्ड्यात, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या. खासदार संजय राऊत यांनीही आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. शिवप्रेमींनीही आमदार लाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान केला जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तर शिवरायांची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार नितीन गडकरी यांच्याशी केली. भाजपचे आमदार व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आगरा सुटकेच्या घटनेशी केली. त्याचेही तीव्र पडसाद उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदार लोढा यांच्या राजीरामान्याची मागणी केली. हा वाद ताजा असतानाच आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर टीका केली. असे वाद घालतच बसा, असे ते म्हणाले. गोरेगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना इशारा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं आधी बंद करा, असे ते म्हणाले होते.

सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. माझी चूक मी लगेच सुधारली, असा खुलासा आमदार लाड यांनी केला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -